कावेरी पाणीवाटप योजना समितीसाठी केंद्राला हवी आहे आणखी मुदत

नवी दिल्ली : कावेरी पाणीवाटप प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारी 2018 या दिवशी अंतिम निकाल दिला आहे. त्यात पाणीवाटपावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याची, तसेच पाणीवाटप योजना तयार करण्याची सूचना केंद्राला करण्यात आली आहे. ही योजना तसेच समिती तयार करण्यासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे.

केंद्र सरकारला असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 9 एप्रिलला दिला होता. त्यात दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र केंद्राने आणखी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. या समितीच्या स्थापनेला कर्नाटक सरकारने विरोध केला आहे. तर तामिळनाडू सरकारने लवकरात लवकर समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत खंडपीठाने केंद्र सरकारचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांना फटकारले. आम्ही निकाल दिलेला असूनही आपण तो गंभीरपणे घेत नाही, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. यावर वेणुगोपाल यांनी आणखी कालावधी देण्याची मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)