कावडीत अनधिकृत बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध

सातारा- बेकायदेशीर बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना नितीन मानकुमरे, व ग्रामस्थ

पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका, व्यापाऱ्याची ग्रामस्थांना दमदाटी
कुडाळ, दि. 18 (प्रतिनिधी) – कावडी, ता. जावळी गावास सायघर हद्दीतून सायपन पद्धतीने पाणी पुरवठा केला जातो. गट नं 30/1, व 30/14 याठिकाणी असलेल्या पाणीपुरवठा पद्धतीवर आतापर्यंत शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र यातील गट नं 30/14 मध्ये मुबंई येथील व्यापारी हुसेन मोहम्मद माला याने अवैध उत्खनन करीत फॅक्‍टरी टाकण्याच्या उद्देशाने जवळपास तीन हजार स्के.फुटचे अवैध बांधकाम सुरू केले आहे. याठिकाणी फॅक्‍टरी झाल्यास भविष्यात कावडी गावास दूषित पाणीपुरवठा होईल, त्यामुळे बफरझोनचे नियम तोडून बांधकाम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कावडी गावास सायघर येथून सायपनने पिण्याचे पाणी आणले आहे. मात्र त्याच्यालगतच व्यापारी माला यांनी खड्डा खणून पिण्याचे पाणी विहिरीत सोडले आहे. तर सदर उत्खनन व विहीर खोदल्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला आहे. मुळातच सायघर हे गाव बफरझोनमध्ये येत असल्यामुळे विहीर काढता येत नाही. तरीदेखील या व्यापाऱ्याने विहीर काढली आहे. तर स्थानिकांना दमदाटी करून सदर व्यापारी दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत याठिकाणी फॅक्‍टरीच्या उद्देशाने बेकायदेशीर बांधकाम करीत आहे.
याठिकाणी फॅक्‍टरी झाल्यास सर्व दूषित पाणी गावच्या पिण्याच्या पाण्यामध्ये परकुलेशन होऊन पिण्याच्या पाण्याच्या मिसळणार त्यामुळे वर्षानुवर्षे गावच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होऊन गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल तरी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन बेकायदेशीर सुरू असलेले बांधकाम बंद करावे, तसेच याठिकाणी काढलेली विहीर मुजवून संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदन देताना नितिन मानकुमरे, नामदेव मानकुमरे, संतोष मानकुमरे, प्रमोद मानकुमरे, नारायण मानकुमरे, उमेश मानकुमरे,सूर्यकांत मानकुमरे, पांडुरंग धनावडे उपस्थित होते.

बफरझोनमध्ये व्यापाऱ्याकडून नियम धाब्यावर
सायघर हे बफरझोनमध्ये येत असून हुसेन माला या व्यापाऱ्याने विहीर, बोअर काढण्यास मनाई असतानाही हे नियम धाब्यावर बसवले आहेत. तर उत्खनन करून शेकडो झाडांची कत्तल कत्तल करून त्यांची विल्हेवाट लावली आहे. त्याचबरोबर सुरू असलेले बांधकाम देखील बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी यावेळी ठणकावुन सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)