काळ्या यादीतील कंपनीवर पालिकेची कृपा

कचरा उचलण्याच्या निविदेत “रिंग’ झाल्याचा आरोप
 
पुणे – कचरा वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या निविदेत “ब्लॅक लिस्टेड’ कंपनीवर महापालिका प्रशासन मेहेरबान झाली असून, या निविदेत “रिंग’ झाल्याचा आरोप महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या निविदेत नमूद केलेल्या अटी-शर्ती या मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेण्ट प्रा. लि. या कंपनीलाच काम मिळावे, या हेतूने तयार केल्याचाही शिंदे यांचा आरोप आहे.

महापालिकेच्या एकूण कामाच्या 25 टक्के उलाढाल असणे हा प्रचलित नियम असताना या निविदेमध्ये “टर्नओव्हर’ 37.50 टक्‍के “टर्नओव्हर’ची मागणी केली. कचरा वाहतुकीच्या निविदेत ट्रक वाहनांची “फिटनेस टेस्ट’ करणे बंधनकारक असताना या निविदेत फिटनेस टेस्टचा समावेश केला नाही. निविदेत समावेश केलेले आणि पात्र केलेले ठेकेदार मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेन्ट प्रा. लि. यांनीच मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट या कंपनीला या निविदेत स्पर्धा होत आहे, हे दाखवण्यासाठी भाग घ्यायला लावला असून, त्यांच्याच सिस्टर असलेल्या कविराज इन्फोटेक या कंपनीबरोबर करार करून कागदपत्रे देण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बृहन्मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेण्ट प्रा. लि. यांचे संचालक असलेल्या कविराज इन्फोटेक आणि विश्वशक्ती ट्रान्स्पोर्ट या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असून, त्याची नोंदही आहे. या निविदेत 28 एम.क्‍युब. ही वाहने असणे बंधनकारक असताना तशी कागदपत्रे मे. स्वयंभू यांनी सादर केलेले नाहीत तरी देखील चुकीच्या पद्धतीने पात्र केले गेले, असेही शिंदे यांनी सांगितले.

या निविदेत सहभागी होताना मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेन्ट प्रा. लि. यांनी सादर केलेली कागदपत्रे, अनुभव दाखला, टर्न ओव्हरची कागदपत्रे ही मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेण्ट सेल प्रा. लि. यांचीच जोडली आहेत. या सर्व बाबी महापालिकेच्या या निविदेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी वरील अर्व कागदपत्रे आयुक्त कार्यालयात पाठवली आहेत.

महापालिकेच अधिकारी आणि महापालिकेची या प्रकरणात दिशाभूल करत असून या खात्याचे प्रमुख माळी आणि अधीक्षक अभियंता पोळ आणि एस्टिमेट कमिटीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आशीर्वादाशिवाय हे कट कारस्थान करणे शक्‍यच नाही, असाही आरोप शिंदे यांनी केला आहे. निंबाळकर यांना एस्टिमेट कमिटीच्या कामातून मुक्त करावे आणि अन्य खातेप्रमुखांची चौकशी करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

बृहन्मुंबई पालिकेच्या काळ्या यादीत नाव

बृहन्मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर असलेल्या काळ्या यादीतील ठेकेदारांच्या यादीतील कविराज इन्फोटेक यांचे प्रमुख विपुल जैन आणि त्यांच्या पत्नी कुसुम जैन, जमनालाल जैन आणि विश्वशांती ट्रान्स्पोर्ट यांचे कमलेश जैन आणि त्यांच्या पत्नी दर्शना जैन, राजकुमार जैन यांच्याच नावाने तयार केलेली मे. ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेन्ट प्रा. लि. ही कंपनी असून त्यामध्ये प्रमोद मिश्रा हे नाव समाविष्ट आहे. ही सर्व माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचेही अरविंद शिंदे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)