काळेवाडी येथे ड्रेनेज फुटल्याने नागरीक त्रस्त

काळेवाडी – विजयनगर येथील श्री मुनिसुब्रत स्वामी जैन मंदिरासमोर ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटल्यामुळे तेथील नागरीक त्रस्त आहेत. येथील दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून तातडीने हे चेंबर दुरुस्त करावे, अशी मागणी ह्युमन राईट्‌स असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शन या संस्थेच्या वतीने आयुक्‍तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटले आहे. चेंबरमधील मैलापाणी मंदिरासमोर आणि रस्त्यावर वाहत असून परिसरातील वातावरण घाण झाले आहे. दोन महिन्यांपासून हा त्रास होत असल्याने नागरिकांना आता उलट्या व जुलाब असे आजार वारंवार होत आहेत. आरोग्य विभागाकडे या संदर्भात तक्रार करुनही प्रशासन व आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहेत. कामाची टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)