काळेवाडी येथील नकला ओढा खोलीकरणाचे काम सुरु

  • भारत फोर्ज कंपनी व लोकसहभागातून बंधारा खोलीकरणाचे काम

गराडे – दिवे (ता. पुरंदर) गावाजवळील काळेवाडी येथील नकला ओढा खोलीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली.जलयुक्‍त शिवार योजनेतंर्गत भारत फोर्ज कंपनी व लोकसहभागातून ओढा खोलीकरणाचे हे काम होणार आहे. भारत फोर्ज कंपनी सीएसआर विभागप्रमुख लीना देशपांडे यांच्या हस्ते ओढा खोलीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. कंपनीने सुमारे 5 लाख 25 हजार रुपयांची मदत या कामाकरीता केली आहे.
जलक्रांतीचे प्रवर्तक व दिवे ग्रामपंचायतचे सदस्य पै. सागर काळे यांच्या प्रयत्नातून भारत फोर्ज कंपनीने ओढा खोलीकरणासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. यावेळी माजी जि.प. सदस्या संगिता काळे, सरपंच निताताई लडकत, ग्रामपंचायत सदस्य सागर काळे, भारत फोर्जचे समन्वयक जयदिप लाड, सहाय्यक देवानंद रोकडे, मंडळ कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी, कृषी सहाय्यक अनिल पाटील, लक्ष्मण काळे, पंढरीनाथ काळे,सुनिता काळे, वैशाली काळे, मोनाली काळे, उमे झेंडे, अमित काळे, बाळासाहेब काळे, पप्पू काळे, किसन शितकल, दत्ता जाधव, वसंत सुतार,रामदास काळे, सावळाराम काळे, कुमार झेंडे, तुकाराम काळे, अमर काळे, आदिनाथ काळे आदींसह काळेवाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
पुणे आणि सासवड शहराजवळ असूनही उन्हाळ्यात काळेवाडीला नेहमीच पाणीटंचाई जाणवते. पुरंदर उपसा योजनेत समाविष्ट असूनही त्याचा फायदा काळेवाडीला होत नाही. नकला ओढ्यातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढून त्याचा उपयोग शेतीला होईल. या आशेने काळेवाडीतील पै. सागर काळे यांनी भारत फोर्ज कंपनीच्या सामाजिक दायित्व विभाग प्रमुख लीना देशपांडे यांच्याशी संपर्क साधून काळेवाडीतील
ग्रामस्थ व तरुणांना विश्वासात घेत कागदपत्रीय पुर्तता करुन 5 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. ओढा खोलीकरणासाठी उर्वरीत लागणारा खर्च लोकसहभागातून करण्याचे ठरले. नकला ओढ्यातील संपूर्ण गाळ काढल्यास भरपूर पाणीसाठा वाढेल. त्याचा फायदा काळेवाडी परिसरातील शेतीला होईल, असे सागर काळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)