काळेवाडी, पळसदेव दरोड्यातील टोळी जेरबंद

  • बारामती गुन्हे शोध पथकाची कारवाई : तिघांना अटक

भवानीनगर – इंदापूर तालुक्‍यातील काळेवाडी नं 1 येथील सोमनाथ श्रीरंग चव्हाण यांच्या घरी झालेल्या चोरीत सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम व मोबाईल संच, असा एकूण 57 हजार रुपयांच्या चोरीतील तीन आरोपींना बारामती गुन्हे शोध पथकाने दीड महिन्यांतच सापळा रचून अटक करून मुसक्‍या आवळल्या. या आरोपींचा पळसदेव येथील दरोड्यात सहभाग होता.
पोलिसांनी दिलेली माहिती की, दि 1 एप्रिल 2017 रोजी काळेवाडी येथील सोमनाथ श्रीरंग चव्हाण यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आई वडिलांना चाकूने मारहाण करून जबरी चोरी केले. सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम व मोबाईल संच, असा एकूण 57 हजारांचा मुद्देमाल नेला. या घटनेचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा हा जक्‍शां शिवा शिंदे याने त्याचे इतर पाच ते सहा साथीदारांच्या सहाय्याने केला आहे. मिळालेली माहितीची खातरजमा करून गोतोंडी येथे सापळा रचून जक्‍शां शिवा शिंदे यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या तुषार उर्फ इशा नानासाहेब सोनवलकर (रा. फलटण, सध्या रा. व्याहळी, ता. इंदापूर) केनशा भगवान काळे (रा. व्याहळी) इतर तीन ते चार साथीदारांसह हा गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून तुषार उर्फ इशा नानासाहेब सोनवलकर यास फलटण येथे अटक करण्यासाठी गेलो असता त्यास पोलिसांची चाहूल लागल्याने तेथून पळाला. परंतु पोलिसांनी साधारण एक किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. केनशा भगवान काळे यास व्याहळी येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोबाईल संचव सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवलदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, रविराज कोकरे, संदिप मोकाशी, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, तुषार सानप, सदाशिव बंडगर यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स. ई. कुलकर्णी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)