काळेवाडी चौकीत पोलिसांना शिवीगाळ

पिंपरी – चौकशीसाठी बोलाविलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलीस चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी पोलीस चौकीत मंगळवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

इम्तियाज बरकतअली आत्तार (वय ३४, रा. परमवीर कॉलनी, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक महेश विनायकराव बारकुले (वय ३५) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी पोलीस नाईक बारकुले काळेवाडी पोलीस चौकीत ड्युटी अंमलदार मदतनीस म्हणून कार्यरत होते. त्यावेळी कोहिनुर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सताराम यादव यांनी ते काम करत असलेल्या हॉटेलचा भागीदार मालक सुरज देविदास कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉटेलचा दुसरा भागीदार आरोपी इम्तियाज याला पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत सर्व पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. फौजदार मुदळ तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)