काळेवाडीत घरफोडी ; 44 हजार लंपास

पिंपरी – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 44 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काळेवाडी येथे बुधवारी उघडकीस आली.

चंद्रकांत जाधव (वय-42, शंभूराज कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान जाधव यांचे घर कुलूपबंद होते. त्या वेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा 44 हजारांचा ऐवज चोरून नेला. रहाटणी, काळेवाडी परिसरात मागील काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही चोऱ्या होत असल्याची तक्रार नागरीक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)