पिंपरी – आई रागावल्याने एका 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
शेजल दोरास्वामी मुदलियार (वय-14 रा. नढे नगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजलला तिच्या आईने घरातील साफ सफाई करायला सांगितले होती. मात्र ती न केल्याने शेजलवर आई रागावली होती. याच कारणावरून शेजलने शुक्रवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास समोर आली. शुक्रवारी आई आणि वडील कामावर गेले होते. दोघेही शेजलला फोन करत होते शेजल फोन उचलत नव्हती.
हा प्रकार बराच वेळ चालला त्यामुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून याची माहिती दिली. शेजारी राहणारा व्यक्ती शेजलाल सांगण्यासाठी घरी गेला पण दरवाजा बंद होता. त्यावेळी त्या व्यक्तीने खिडकी मधून डोकावून पाहिले असता शेजलने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने शेजलच्या आई-वडीलांना कळवल्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे करत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा