काळेवाडीत अतिक्रमण पथकावर दगडफेक

File Photo

पिंपरी – काळेवाडी, रहाटणी, नखातेवस्ती येथील विकास आराखडा (डीपी) रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम धारकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी आल्याने संतप्त नागरिकांनी आज गोंधळ घातला व अतिक्रमण पथकावर दगडफेक केली.

काही नागरिकांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विकास आराखड्यात 12 मीटर डीपी रस्ता प्रस्तावित आहे. रहाटणीतील नखाते चौक ते कोकणे चौक जोडणारा हा रस्ता आहे. येथे 1985 पासून 50 हून अधिक घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा या रस्त्याला विरोध आहे. 12 ऐवजी 9 मीटर रस्ता करावा, अशी मागणी रहिवाशांनी आयुक्‍तांकडे केली होती.

त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्‍तांनी दिले होते. परंतु, ते रजेवर असताना बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत बांधकाम धारकांना कारवाई अगोदर 24 तासापूर्वीची नोटीस देण्यात आली नाही. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)