काळा पैसा परत आणण्यासाठी पाकिस्तानचा 10 देशांबरोबर समझोता 

इस्लामाबाद (पाकिस्तान) – देशातून बेकायदेशीर रीतीने देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत देशात आणयासाठी पाकिस्तानने 10 देशांशी समझोता केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक शहजाद अकबर यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आलेली आहे.

बेकायदेशीर रीतीने पाकिस्तानबाहेर गेलेल्या 700 कोटी रुपयांबाबत महत्त्वाची माहिती जमा करण्यात आल्याचे स्पष्ट करून शहजाद अकबर यांनी पुढे सांगितले की. ही सर्व माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. देशाबाहेर गेलेला हा काळा पैसा देशात परत आणण्याच्या दृष्टीने सरकार सतत प्रयत्न करत असल्याचे त्यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले.

-Ads-

परदेशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या हितसंबंधांचे सरकार रक्षण करील. देशातील आर्थिक व्यवहारांना गती मिळावी यासाठी व्यापारी वर्गाला विशेष सवलती देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. मलेशियातील पाकिस्तानी नागरिकांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाबाबत इम्रान खान यांनी चर्चा केल्यानंतर एक दिवसाने शहजाद अकबर यांचे निवेदन आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)