काळानुसार चित्रपटात बदल निश्‍चित हवा -सतीश राजवाडे

लोणावळा – कोणत्याही चित्रपटाचे यश चित्रपटातील कशावर व कोणत्या घटनेवर अवलंबून असते, हे सांगणे अशक्‍य आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील काय आवडेल आणि काय नाही, हे सांगणे असंभव आहे. काळानुसार जगातील प्रेक्षक वर्ग बदलत असल्याने चित्रपटातील बदल निश्‍चित असायला हवा. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत का याबाबत अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. मात्र आपण किती जण मराठी चित्रपट बघतो,यावरच प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचे यश अवलंबून असते, असे विचार चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्‍त केले.

लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमाला समितीच्या वतीने आयोजित 16 व्या वसंत व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना “मराठी चित्रपट सृष्टी’ या विषयावर सतीश राजवाडे बोलत होते. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष प्रशांत पुराणिक, उपाध्यक्ष संजय वाड, विकास खोले, पल्लवी राजवाडे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सतिश राजवाडे म्हणाले, मराठी प्रेक्षक अत्यंत सुजान व हुशार आहे. बहुतांश प्रेक्षक हे चित्रपटांच्या जाहिरातीनुसार चित्रपट पहात नसतो, तर तो त्याच्या प्रादेशिक चित्रपटाची भाषा, चित्रपटाचा आशय, कथा, विषय याची चाचपणी करून पहातो. काही वर्षांपासून मराठी चित्रपट ग्लोबल झाला असून जगभरात या चित्रपटांना प्रोत्साहन व पसंती वाढत आहे. त्यामुळे उत्तम व सशक्‍त चित्रपट निर्माण करणे ही दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी आहे.

चित्रपट निर्माता व दिग्दर्शक ही संधी व व्यवसाय नसून तो छंद असल्याचे राजवाडे म्हणाले.कोणत्याही चित्रपट व मालिकेसाठी निर्माता हा महत्वाचा घटक असतो. त्याच्याशिवाय चित्रपटाचा आर्थिक गाडा पुढे जात नाही. चित्रपट आणि मालिका निर्मितीसाठी लेखक, कथाकार, कलाकार, वेशभूषाकार छायाचित्रकार, तंत्रज्ञान, गीते, गाणी, लायटिंग, स्थळे, प्रासंगिक अशा अनेक गोष्टी व बाबींची नितांत गरज असते. याशिवाय या क्षेत्रात तुमच्या कुटुंबाचा पाठींबा आणि विश्‍वास महत्वाचा असतो. तसेच प्रत्येकाला लखलखाट, चंदेरी दुनिया हवी असते. मात्र त्याकरता मेहनत आणि प्रतीक्षा हवी असते, असे सतिश राजवाडे म्हणाले. आनंद गावडे यांनी प्रास्ताविक, चित्रा जोशी यांनी सूत्रसंचालन व दीप्ती कमलवार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)