काळवीट शिकार प्रकरण: सलमान खानच्या भवितव्याचा फैसला 5 एप्रिलला

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या भवितव्याचा फैसला पुढच्या गुरुवारी होणार आहे. वर्षानुवर्ष न्यायालयात सुरु असलेल्या या खटल्याचा निकाल 5 एप्रिल रोजी लागणार आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी देवकुमार खत्री निकाल देणार आहेत.

राजस्थानातील जोधपूरमधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानशिवाय अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलमही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सलमानने शिकार केली असून इतर कलाकारांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. सलमानविरोधात 1998 मध्ये चार केस दाखल करण्यात आल्या. तीन प्रकरणं हरणाऱ्या शिकारीची असून चौथं प्रकरण आर्म्स अॅक्टचं आहे. सलमानला अटक करताना त्याच्या खोलीतून पोलिसांनी पिस्तुल आणि रायफल हस्तगत केली होती. दोन्ही शस्त्रांच्या परवान्याचा कालावधी संपला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)