काळभोर महाविद्यालयात उद्या कार्यक्रम

लोणी काळभोर- समाजभूषण गणपतराव काळभोर यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिलकुमार कुरणे यांनी दिली. कुरणे म्हणाले की, शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुख्य कार्यक्रम महाविद्यालयात होणार आहे. या वेळी देवाची आळंदी येथील हभप गोविंद महाराज गोरे हे प्रमुख वक्‍ते आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका कमल काळभोर भूषविणार आहेत. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, सरपंच अश्विनी गायकवाड, उपसरपंच योगेश काळभोर, माजी सरपंच वंदना काळभोर, शालिवाहन काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, उद्योजक राहुल काळभोर आदी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रशांत काळभोर व समाजभूषण गणपतराव काळभोर यांचे पणतू राहुल काळभोर यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)