काळभोर महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश

लोणी काळभोर- सावित्रीबई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे आंतर विभागीय वेटलिफ्टिंग व शरीर सौष्ठव क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवारी आणि गुरुवारी (दि. 24 आणि 25) सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर, अहमदनगर येथे करण्यात होते. या स्पर्धेत समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील विशाल निकम (प्रथम वर्ष, कला) याने शरीर सौष्ठव स्पर्धेत 65 कि. ग्रॅ. वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले, तसेच गणेश बायकर (प्रथम वर्ष, बी. कॉम) याने वेटलिफ्टिंग स्पर्धेत 73 कि. ग्रॅ. वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. या खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना शालेय शिक्षण संचालक प्रा. अमित गिरीगोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस. बी. कुरणे आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारीवृंद यांनी खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)