काळभोर टोळीतील सराईताकडून 2 पिस्तूल, 4 काडतूसे जप्त

पुणे- खून, खुनाचा कट रचणे, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अजय काळभोर टोळीतील एका गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड, उत्तर विभागाने ही कारवाई केली. दत्ता विठ्ठल आगलावे (25, रा. तुकारामनगर, वाल्हेकवाडी), असे अटक केलेल्या गुंडांचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 61 हजार 200 रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला. आगलावे याच्यावर पुणे शहर व ग्रामीण पोलिसात खून, कट रचणे, दरोड्याचा प्रयत्न तसेच गावठी कट्टे जवळ बाळगल्याचे चार गुन्हे दाखल आहेत.

जप्त केलेली दोन पिस्तुले ही यापूर्वी अटक करण्यात आलेले अजय काळभोर व तिरुपती ऊर्फ बाब्या जाधव यांनी दिलेली आहेत. ही हत्यारे मध्यप्रदेश येथून आणली असून पुण्यातील ओळखीच्या लोकांना त्याची विक्री करून पैसे कमवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्‍त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्‍त (गुन्हे) पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार व कर्मचारी राजू मोरे, भालचंद्र बोरकर, निलेश शिवतरे, किरण चोरगे, अतुल मेंगे, तानाजी गाडे, राजनारायम देशमुख, प्रदीप शेलार, नवनाथ चांदणे, शीतल शिंदे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)