काळभैरवनाथ यात्रेनिमित्त रंगली कलगीतुऱ्याची जुगलबंदी

अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त कलगी तुऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलगीवाले शिवाजी खेडकर आणि पार्टी, तर हाजी टाकळी येथील तुरेवाले शिवाजी पायमोडे यांच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. यावेळी अवसरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलगी तुऱ्याच्या कार्यक्रमात आध्यत्मिक गोष्टीचे निराकरण करण्यात आले. तसेच माया व ब्रम्ह या विषयांवर प्रश्न आणि त्याची आध्यात्मिक उत्तरांची जुगलबंदीने प्रेक्षक भारावून गेले. कलगी-तुरेवाले यांना हरिचंद्र शिंदे, लक्ष्मण शिंदे, भरत पाचारणे, संतोष बत्तीशे, राजू तळेकर, सतीश पोखरकर, दत्तात्रय टाव्हरे यांनी साथ-संगत दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)