काळदरी येथे करंजाई देवीचा उत्सव

काळदरी-माघी पौर्णिमेच्या निमित्ताने काळदरी येथील जागृत देवस्थान असणाऱ्या करंजाई देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ व महिलांनी यावेळी होमहवन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. पुरंदर तालुक्‍यातील काळदरी गाव अतिदुर्गम असून येथील करंजाई देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. येथे करंजाई देवीची पुरातन मूर्ती असून डोंगराच्या कुशीत देवीचे मंदिर आहे. मंदिरानजीकच्या पाणवठ्यावर काळदरी बांदलवाडी, बहिरवाडी येथील ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येत असत. नवसाला पावणारी देवी म्हणून या करंजाई देवीची ख्याती आहे. वर्षभर पौर्णिमेला येथे अभिषेक करण्यासाठी भाविक येत असतात. गतवर्षी मंदिरापर्यंत कच्च्या रस्त्याची सोय उपलब्ध झालेली असून खडीकरण होणे गरजेचे असल्याचे भाविकांनी सांगितले. याप्रसंगी काळदरीचे उपसरपंच अंकुश परखंडे, माजी सरपंच फुलाबाई शेलार, ग्रामसेवक शशांक सावंत, पुरोहित नीलकंठ कुलकर्णी, राजेश शेलार, ज्ञानदेव शेलार, शरद कारकर, राजेंद्र कारकर, ज्ञानदेव शेलार, महादेव राऊत, आण्णा शेलार, पांडुरंग शेलार, माणिक शेलार, विनायक शेलार, निवृत्ती जाधव, हरिभाऊ शेलार, सुरेश शेलार, किसन राऊत, तुळशीराम शेलार, शंकर जगताप, हनुमंत शेलार, कृष्णा शेलार, बाळासाहेब पेटकर, विजय मिसाळ, सोपान शेलार आदी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
157 :thumbsup:
295 :heart:
20 :joy:
100 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)