काळदरी खोऱ्यात भात लावणी अंतिम टप्प्यात

काळदरी- पुरंदर तालुक्‍यातील काळदरी खोऱ्यात सध्या शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू असून भात लावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. काळदरी परिसरात बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी, इंडम आदी जातीचे भात घेतले जाते. या भागातील शेतकरी सोयाबीन, भुईमूग, ज्वारी या पिकांसोबतच भाताचे देखील पीक घेतात.
जून महिन्यापासून जोरदार पाऊस झाल्याने भात रोपे उत्तम दर्जाची आलेली आहेत. गावात सुरवातीपासूनच भात लावणीने वेग घेतला असून सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे. इथून पुढील काळात देखील चांगला पाऊस पडला तर भाताचे उत्पन्न चांगले येऊ शकते. असे काळदरी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी पेठ पेटकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)