काळजी घ्या… उन्हाचा चटका वाढतोय

कमाल तापमानात वाढ 


तापमान आणखी वाढण्याचा अंदाज

पुणे- गेल्या आठवड्यात असणारे ढगाळ वातावरण आता निवळले असल्याने राज्यात पुन्हा एकदा सूर्य आग ओकू लागला आहे. त्यातच हवामान सुद्धा कोरडे असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तर तापमान हे सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ वगळता राज्यात उर्वरित ठिकाणी तापमान वाढण्याची शक्‍यता आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात अचानक तापमानात घट झाली होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे हा बदल झाला होता. रविवारपर्यंत अशीच स्थिती होती. रविवारी तर राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र एकदम हवामानात बदल होऊन उन्हाचा चटका वाढला आहे. यंदाच्या हंगामात भिरा येथे उच्चांकी 42 अंशांची नोंद झाल्यानंतर मागील आठवड्यात तेथील तापमान 31 अंशांपर्यत घसरले होते.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक प्रमुख शहरांचे तापमान 35 ते 36 अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. पुणे शहरातही सोमवारपासून तापमानात बदल होत आहेत. अचानक उकाडा वाढला आहे. कमाल तापमानही सरासरीपेक्षा अधिक वाढले आहे. हा बदल आगामी दोन दिवस तरी कायम राहणार आहे, असे हवामान खात्याने कळविले आहे.

सोमवारी दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर विदर्भ आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, उत्तर ओडिशापासून कर्नाटकपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ हवामान होते. विदर्भात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, तर उर्वरित राज्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहून तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)