काळचौंडीत जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांना अटक

म्हसवड, दि. 29 (प्रतिनिधी) – काळचौंडी (ता. माण) येथे तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कमेसह एक लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी 9जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, काळचौंडी येथे रविवारी रात्री तीन पानी पत्त्याचा खेळ पैशाची पैज लावून सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. सपोनि मालोजीराव देशमुख व सहकाऱ्यांनी दि. 28 दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांसमवेत काळचौंडी येथील पठार नावाच्या शिवारातील पत्र्याच्या शेडच्या आडोशास सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेले किसन काशीनाथ खरजे (वय 45) रा. विभुतवाडी, ता. आटपाडी जि. सांगली, किसन काशीनाथ माने (वय 44) रा. काळचौंडी ता. माण, संजय भिकू चवरे (वय 40), शिवाजी मोहन सोळसे (वय 45), चंद्रकांत किसन माने, (वय 45), संजय पांडुरंग सोळसे (वय 45), विक्रम रंभाजी सुळे (वय39) सर्व रा. झरे, ता. आटपाडी, तात्यासाहेब भाऊ डोंबाळे (वय 35) व दिपक महादेव सोळसे (वय 36) रा. पारेकरवाडी, ता. आटपाडी या नऊजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम 16 हजार 50 रुपये, नऊ मोबाईल, आठ दुचाकी, असा 1 लाख 85 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त केला. सपोनि देशमु, उपनिरीक्षक गोसावी, हवालदार अभिजीत भादुले, संतोष बागल, नितीन धुमाळ, प्रदीप जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)