काल्याच्या किर्तनाने होणार पारायण सोहळ्याची सांगता

कुरवली – कर्दनवाडी (लासुर्णे) येथे ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवार (दि. 8) पासून प्रारंभ झाल आहे. या सप्ताहात अखंड वीणावादन, पहाटे काकडा, दुपारी गाथावाचन, भजन व हरिकीर्तन, रात्री हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर होत आहे. पारायण सोहळ्याचे हे 38 वे वर्ष असून सप्ताहमध्ये हभप जनार्दन गावंडे, श्रीनिवास वाघमोडे, हरीभाऊ शिंदे, ज्ञानेश्‍वर तांबे, एकनाथ सदगीर, शरद घोळवे, सुनील माने, केशव मुळीक, अनिल पाटील, रणजित शिंदे, लक्ष्मण कोकाटे, शहाजी मोरे, शिवलिंग स्वामी महाराज यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. मंगळवारी (दि 15) हभप बन्सी महराज उबाळे पैठण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)