काले येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

वडज/जुन्नर- काले येथे वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ व्हावा, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लागावा, हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी काळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण होते. मिळालेल्या साहित्याचा वापर योग्यरितीने करावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. या कार्यक्रमप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सी. बी. गांधी, माजी सभापती बाजीराव ढोले, संचालक दत्तात्रय म्हसकर, डी. एल. म्हस्के, उज्वला शेवाळे, शेटीराम चौगुले, माजी नगरसेविका वैष्णवी चतुर, बाळासाहेब सदाकाळ, फिरोज पठाण, मीननाथ पानसरे, उपसरपंच जनार्दन पानसरे, माजी सरपंच रवींद्र पानसरे, शशिकांत पानसरे, कुलदीप नायकोडी, शिक्षिका मनीषा काशीद, यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक दप्तरे, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीननाथ पानसरे यांनी केले. तर मनीषा उगले यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)