काले येथे आज जंगी कुस्त्यांचे मैदान

1 लाख 51 हजाराचे पहिले इनाम

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) – काले, ता. कराड येथील ग्रामदैवत श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मंगळवार, दि. 4 रोजी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवार यांच्यावतीने कुस्त्यांचे जंगी मैदान होत आहे. (कै.) सर्जेराव निकम यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरी नंदु आबदार विरुध्द विलास डोईफोडे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. विजेत्यास एक लाख 51 हजाराचा इनाम व व्यंकनाथ केसरी किताब दिला जाणार आहे.
या कुस्त्यांचे जंगी मैदानात दुसर्‍या क्रमांकाची पैलवान समीर देसाई विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोरवड यांच्यात कुस्ती होईल. विजेत्यास 1 लाख एक रुपयाचे इनाम व सत्यजीत केसरी किताब दिला जाणार आहे. सिकंदर शेख विरुध्द विक्रम पारखे, संभाजी कळसे विरुध्द आबा रास्कर, तन्वीर पटेल विरुध्द अमर पाटील, अमर पाटील विरुध्द निलेश पाटील, संग्राम पाटील विरुध्द तेजस कदम, पृथ्वीराज पाटील विरुध्द विवेक लाड यासह 63 चटकदार कुस्त्या होणार आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. सतेज पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. विश्वजीत कदम, माजी आमदार मदन भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते, विनायकराव पाटील, राजेश पाटील, मनोहर शिंदे, नवनाथ ढवळे, जयवंत जगताप, चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी सुनिल पाटील व नामदेव पाटील यांच्यासह हिंदकेसरी संतोष वेताळ यांना कुस्ती भूषण, रविंद्र पाटील यांना आदर्श वस्ताद, सुभाषराव पाटील यांना आदर्श सरपंच, सचिन पाचुपते यांना कुस्तीप्रेमी, विजय पाटील व दिनकर थोरात यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.
ईश्वरा पाटील व सुरेश जाधव मैदानाचे समालोचन करणार आहेत. मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

What is your reaction?
41 :thumbsup:
42 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)