काले येथील कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या 

कराड – काले, ता. कराड येथे श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्यावतीने झालेल्या जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे विरुध्द विजय धुमाळ यांच्यातील कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विलासने दोन ते तीन वेळच्या घुटना डावांना हुलकावणी देणाऱ्या विजयला अखेरीस त्याच डावाने चितपट केले.

विजेत्या विलास डोईफोडेला 1 लाख 51 हजार व इंद्रजित चव्हाण यांच्या सौजन्याने व्यंकनाथ केसरी किताब देण्यात आला. आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, विनायकराव पाटील, जयसिंगराव कदम, ऍड. आनंदराव पाटील, संजय जगदाळे, प्रदिप थोरात, मनोहर शिंदे, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, जयवंतराव जगताप, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, इंद्रजित चव्हाण, पै.धनाजी पाटील, ऍड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, सुभाषराव पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब गलांडे, उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, उमेश साळुंखे, वैभव थोरात उपस्थिती होते.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोरवडने समीर देसाईला घुटना डावावर पराभूत केले. त्याला 1 लाख 1 रुपये इनाम व सत्यजित केसरी किताब देवून गौरविण्यात आले. विक्रम पारखे विरुध्द दत्ता नरळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. विक्रमने एकलंगी डावावर दत्तावर मात केली. संभाजी कळसे विरुध्द आबा रास्कर यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली. तर अमर पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या कुस्तीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

शशिकांत बोर्गार्डे, असिफ शेख, अनिरुध्द पवार, विवेक पाटील, अविनाश वरपे, रितेश चोपडे, दत्ता बनकर, दिग्विजय जाधव, बाला इनामदार, महेश साळुंखे, रोहित शेवाळे, सुशांत साळुंखे यांच्या कुस्त्या चटकदार झाल्या. मैदानात हिंदकेसरी पै. संतोष वेताळ यांना कुस्तीभूषण, नामदेव पाटील यांना आदर्श उद्योजक, सुभाषराव पाटील यांना आदर्श सरपंच, सचिन पाचुपते यांना कुस्तीप्रेमी तर विजय पाटील व दिनकर थोरात यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ऑल्मपिकवीर बंडा पाटील, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, आनंदा धुमाळ, हणमंतराव जाधव, विनायक पाटील, जयकर खुडे, सचिन बागट, प्रमोद पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. ईश्वरा पाटील, सुरेश जाधव, पवन पाटील, आनंदराव जानुगडे यांनी समालोचन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)