कालिदासच्या कट्टयावर अखेर अतिक्रमणचा हातोडा

सातारा, ता. 5 (प्रतिनिधी) – पोवई नाक्‍यावरील जुन्या कालिदास पेट्रोल पंपाचा वाहतूकीस अडथळा होणारा कट्टा हटविण्यात अखेर पालिकेला यश आले. तीन वर्षांपूर्वी हा पंप तेथून हटविण्यात आला आहे. तथापि, कट्ट्याने जागा आडवून धरली होती.
जेसीबीने पुर्वीच्या पेट्रोलपंपाचा कट्टा हटवून पालिकेने जागा रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतली. या जागेवर तात्पूरता मुरुम टाकून रुंदीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरत असल्याने तीन वर्षांपूर्वी या पंपाचे बांधकाम पाडले होते. त्यादिवसापासून पंप बंद आहे. मात्र त्याच्या दारातील कट्टा तसाच होता. त्यामुळे रहदारीसाठी ही जागा वापरात येत नव्हती. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शिवाजी सर्कल ते पोलिस कवायत मैदान हा रस्ता, कालिदास पंपाजवळ अधिकच अरुंद झाला आहे. त्यामुळे कट्टा पाडून रुंदीकरण करणे गरजेचे होते.
गेल्या आठवड्यात जागा ताब्यात घेण्यासाठी पोवई नाक्‍यावर गेलेले पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कालिदास पंपाच्या जागेवर जाऊन थबकले होते. दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर कर्मचाऱ्यांना हात हलवत परत यावे लागले होते. पुन्हा या पथकाने डिप्लोमॅसी’ करत चर्चेअंती जागा ताब्यात घेतली. जेसीबीच्या सहाय्याने कट्टा हटविण्यात आला. याठिकाणी सध्याचा रस्ता सहा मिटर रुंदीचा असून रुंदीकरणानंतर तो 20 मीटर रुंद होईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. ही कार्यवाही भाग निरीक्षक सतीश साखरे, अतिक्रमण विभाग निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)