कालिंदी एक्‍सप्रेसमध्ये कमी क्षमतेचा स्फोट

नवी दिल्ली – कानपूरजवळ कानपूर- भिवानी कालिंदी एक्‍सप्रेसमध्ये बुधवारी कमी क्षमतेचा एक स्फोट झाला. रेल्वे कानपूरपासून 30 किलोमीटर अंतरावरील बराजपूर स्थानकामध्ये थांबली असताना संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी कालिंदी एक्‍सप्रेस रेल्वेच्या स्वच्छतागृहामध्ये हा स्फोट झाला. मात्र या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही साहित्यही आढळले आहे. काही हस्तलिखीत साहित्यामध्ये धमकीवजा मजकूर लिहीलेला असल्याचे, कानपूर विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अविनाश चंद्रा यांनी सांगितले. या घटनेनंतर रेल्वेच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेल्वे पुढील मार्गावर मार्गस्थ करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेनंतर दहशतवाद विरोधी पथकालाही पाचारण करण्यात आले असून स्फोटामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. प्रथमदर्शनी हा स्फोट फटाक्‍यांच्या दारुच्या आधारे घडवल्याचा संशय आहे. या स्फोटामुळे स्वच्छतागृहाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)