कालव्यात सापडला शाळकरी मुलीचा मृतदेह

निघोज  – पारनेर तालुक्‍यातील जवळा येथील पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या कुकडी कालव्यात चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीचा मृतदेह सापडल्याने जवळा व परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील कुशाबा केदार यांची थोरली मुलगी रेश्‍मा कुशाबा केदार ही आदिवासी समाजाची तेरा वर्षे वयाची शाळकरी मुलगी गेल्या चार दिवसांपासून घरातून अचानक बेपत्ता झाली होती. त्याबाबत निघोज पोलीस दुरक्षेत्रात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात येऊन तिचा सर्व परिसरात नातेवाईक कसून तपास करीत होते. शेवटी ज्याची सर्वाना भीती वाटत होती, तेच घडले तिचा मृतदेह जवळा परिसरातील गव्हाळी शिवारातील चारी न चारला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुकडी कालव्यात लोखंडी पाईपला कुजलेल्या व अडकलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यानच्या काळात निघोज पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा नागरिक व नातेवाईक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तो पारनेर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास पोलीस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निकम व पोकॉ शिवाजी कावडे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)