कालव्याची दुरवस्था; त्यात कचऱ्याचे साम्राज्य

वानवडी – वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदुवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो. परंतु, या कालव्याची दुरवस्था झाली असून त्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य परसलेले दिसत आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागात पाणी मिळण्यासाठी खडकवासला धरणातून ज्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाते, त्या कालव्यात कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले असल्याने जमिनीसारखा भाग तयार होऊन त्यावर कुत्री, जनावरे बसत असल्याने अशा पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कठड्यांची, भिंतीची दुरवस्था होऊन कालव्याच्या पात्रात ढासाळल्याने पात्र कमी होऊन पाण्यातच दगड मातीचे ढीग साचले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालव्याच्या स्वच्छतेकडे पुणे महानगरपालिका व पाठबंधारे खात्याचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कालव्याची कधीही स्वच्छता होताना दिसत नाही. तळाला असलेल्या घाणीमुळे जीव जंतू, प्राणी व मृतदेह यात अडकून सडले जातात व तेच पाणी पुढे शेतीसाठी व पिण्यासाठी वापर केला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)