कालव्यांसाठी शिवसेनेचा तहसीलवर मोर्चा ; राष्ट्रवादीमुळे कालव्यांचे वाटोळे झाल्याचा आरोप

काम बंद पाडणारांचा केला निषेध 

कोपरगाव: मागील अनेक वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या विचारधारेने निळवंडे व गोदावरी कालव्यांचे वाटोळे केले. त्यांच्यामुळे कोपरगाव व राहता तालुके उद्‌ध्वस्त झाल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव शिवसेनेच्यावतीने आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निळवंडे कालव्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांचा निषेध करत, हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील शिवायलयापासून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी लबडे म्हणाले, गोदावरी कालव्यांना 105 वर्षे, तर निळवंडेला 49 वर्षे पूर्ण होऊनही त्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व्यववस्था सुरूळीत होऊ शकली नाही. सन 1999 ते 2014 सलग 15 वर्षे राष्ट्रवादीकडे जलसंपदा व महावितरण ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळयाची खाते होती. या काळात इंडियाबुल्स कंपनीला परवानगी दिली. शेतकाऱ्यांचे हक्कचे ब्लॉक रद्द करण्यात आले. सन 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला. सरासरी नऊ हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र गोदावरी कालव्यांचे कमी झाले. नूतनीकरणाकरिता निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची दुरुस्ती व पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी वेळेत नियोजन झाले नाही. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. परिणामी लाभक्षेत्रातील शेतीचे वाटोळे राष्ट्रवादीमुळे झाले. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे व शिर्डी साईबाबा संस्थानच्या सहकार्याने निधी उपलब्ध आहे. मात्र काम सुरू झाल्यावर नेहमीच कुटनीती करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या विचाराचे कार्यकर्ते व आमदार पुत्र यांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यात राजकारण सुरू केले आहे.

नितीन औताडे म्हणाले, आदिवासींचे नेते म्हणवणआऱ्या पिचड यांनी 182 गावांतील आदिवासी जनतेचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रकार सुरू केला आहे. पाण्यावर पुस्तके लिहिणाऱ्या दिवंगत नेत्याची तिसरी पिढी तालुक्‍याचे तेच प्रश्‍न घेऊन गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. या युवा नेत्याने लोकांना भूलथाप देऊन त्यांच्या मतावर डोळा ठेवू नये.
यावेळी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे पाच पांडव आता एकत्र आले आहेत. तेव्हा कौरवांनी सावध राहावे. श्रीकृष्णरूपी मतदार या दोघांचा वध केल्याशिवाय राहणार नाही. स्व. सूर्यभान वहाडणे यांच्या विचारांचे कार्यकर्ते व शिवसेनेने भविष्यात के. के. (काळे-कोल्हे) हटाव तालुका बचाव हा नारा दिला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी निळवंडेला काळवंडून टाकणाऱ्या राजकारण्यांना सर्वप्रथम हाकलले पाहिजे.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, अनिल सोनवणे, राजेंद्र सोनवणे, नगरसेविका सपना मोरे, विमल पुंडे, रावसाहेब टेके आदींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चामध्ये शहर प्रमुख असलम शेख, प्रफुल्ल शिंगाडे, भरत मोरे, सलीम पठाण, रावसाहेब थोरात, सुरेश गिरी, पोपट गोर्डे, शिवाजी चौधरी, रवींद्र वाघ, अशोक डुबे, शिवाजी जाधव, चंदू भिंगारे, महेंद्र देवकर, किरण खर्डे, अशोक कानडे, योगेश मोरे, गगन हाडा, बाबासाहेब गुंजाळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान तहसीलदार किशोर कदम व ऊर्ध्व प्रवरा निळवंडे दोन कालव्यांचे उपअभियंता विवेक लवाट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)