कालवा समितीची बैठक ठरणार वादळी

संग्रहित छायाचित्र

उद्या बैठक


जादा पाणी वापरावरून वादाची शक्‍यता


कथित थकबाकी प्रकरणही पेटण्याची चिन्हे

पुणे- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील उर्वरीत पाण्याचे नियोजन करण्यासाठी येत्या गुरूवारी (दि. 29) रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यात प्रामुख्याने महापालिकेच्या अधिकच्या पाणी वापराबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

खडकवासला प्रकल्पामध्ये सुमारे 14 टीएमसी (50 टक्के) उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, महापालिकेकडून शहरासाठी दिवसाला 1150 एलएलडी पाणी वापरणे शिल्लक असताना; पालिका दरदिवसाला 1600 ते 1650 एमएलडी पाणी वापरत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे कठोर नियोजन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेस दिला आहे. तसेच महापालिकेकडे 354 कोटींच्या थकबाकीचीही मागणी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांवरून ही बैठक वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. सकाळी 10 वाजता व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे खडकवासला धरण कालवा सल्लागार समितीची बैठक

चालू वर्षी राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे 100 टक्के भरली होती. यामुळे एप्रिल उजाडला, तरी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पांतील धरणांमध्ये एकूण आजअखेर 14 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील सुमारे 7 टीएमसी पाणी दौंड, इंदापूर, हवेली तालुक्‍यातील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर 6 टीएमसी पिण्यासाठी महापालिकेसाठी राखीव ठेवले आहे. तर उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता सुमारे 1 टीएमसीपर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुरूवारच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)