कालवा भरावाचे काम लवकरच पूर्ण होणार

पावसाने अडथळे : पाटबंधारे विभागाची माहिती

पुणे – दांडेकर पूल परिसरात झालेल्या मुठा उजवा कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर कालवा फुटलेल्या ठिकाणी क्रॉंक्रिटची भिंत उभी करण्यात आली आहे. तर, त्याच्या मागील भागात भरावाचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसामुळे भरावाच्या कामात अडथळे निर्माण झाले. दरम्यान, शुक्रवारी भरावाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-

जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून मुठा उजवा कालव्याची दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे. 125 कर्मचारी व अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कालवा दुरूस्तीचे काम करत आहेत. गुरूवारी कालवा दुरूस्ती पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीवेळी अडथळे निर्माण झाले. फुटलेली भिंत बांधून पूर्ण करण्यात आली असून जलसंपदा विभागाच्या आराखड्यानुसार भिंतीभोवती मातीचा भराव टाकणे सुरू आहे. मात्र, पावसामुळे अजून काम पूर्ण होऊ शकले नाही. शुक्रवारी कालवा दुरूस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)