कालवा फुटीसाठी धोकादायक असणारे घटक काढा

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍यात सोरतापवाडी उरुळी भागातील जुना बेबी कॉलवा फुटण्याची शक्‍यता आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यावर पाटंबंधारे आणि पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी 40 टक्कयाने तात्काळ कमी केली आहे. पाण्याची पातळी कमी करण्यात आली असली तरी, कालवा फुटु द्यावयचा नसेल तर कालवा फुटीसाठी धोकायदायक ठरणारे कालव्यातील जलपर्णी, इतर गवत आणि जल वाहतुकीला अडथळा ठरणारे घटक काढण्याची नितांत गरज आहे, असे मत अभिषेक कांचन यांनी व्यक्त केले.

उरुळी कांचन परिसरात बेबी कालवा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी केवळ पाण्याची पातळी कमी करणे ही बाब म्हणजे “आग रामेश्‍वरी अन्‌ बंब सोमेश्‍वरी!’ या म्हणी प्रमाने ठरणारी आहे. कालवा फुटीसाठी सर्वात मोठा धोका हा कालव्याच्या अस्तरीकरणाबरोबरच, कालव्यातील जलपर्णी तसेच काही पुल असताना, अडथळे दूर करण्याएवजी कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याची पातळी कमी करणे, ही बाब चुकीची आहे. याबाबत पाटबंधारे खात्याने हालचाली न केल्यास पूर्व हवेलीत आंदोलन उभारण्याचा इशारा रतिकांत कांचन अमित कांचन यांनी दिला आहे.
याबाबत भाऊसाहेब कांचन आणि मुकेश महाडिक म्हणाले, हवेली आणि दौंड तालुक्‍यातील हजारो एकर शेतीसाठी पुणे महानगरपालीकेच्या वतीने शहरातील शुध्द केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलच्या मदतीने बेबी कालव्यात सोडले जाते. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मात्र, कालव्याचे अस्तरीकरण ढिसाळ आणि पोकळ झाल्याने लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन तसेच बोरी एैदी भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यातच कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी तसेच गवत कालव्यात उगवल्याने पाणी कालव्यातून सलग वाहत नाही. याचा फटका कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना बसला आहे. तर कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन हद्दीतील काही लोकवस्तीत पाणी शिरल्याने घरे पडण्याची भिती निर्माण झाली आहे. कालव्यातील गवत आणि इतर अडथळे काढल्यास हा पाणी पाझरण्याचा प्रश्न निकालात निघण्याची शक्‍यता आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे अधिकारी कालव्यातील अडथळे दूर करण्याकडे लक्ष देत नाहीत, असे भाऊसाहेब कांचन यांनी सांगितले.

  • कालव्यातील जलपर्णी हाच मोठा अडथळा
    उरुळी कांचन हद्दीत पांढरस्थळा अशा अनेक ठिकाणी कालव्यावरुन जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या रसत्याच्या खाली पाणी जाण्यासाठी छोट्या आकाराचे पाईप असल्याने पाणी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यातच कालव्यातील गवत आणि जलपर्णी अडथळाही मोठा असल्याने खऱ्या अर्थाने कालव्याची हीच शोकातिंका आहे. पाणी कमी करण्याएवजी पाटबंधारे विभागाने वरील कामे केल्यास पाण्याची पातळी वाढवले तरी काही काळजी उरणार नाही.
  • कालवा फुटीसाठीच्या धोक्‍याला कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीपेक्षा पाणी वाहतुकीला अडथळे घटक कारणीभूत ठरतील, हा शेतकऱ्यांचा आरोप मान्य आहे. यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत जेसीबीच्या मदतीने जलपर्णी आणि इतर गवत काढण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी यापुढील काळात तातडीने पावुले उचलण्यात येतील. शेतकऱ्यांनीही आपआपल्या हद्दीतील अडचणीची माहिती पाटबंघारे खात्याला द्यावी.
    -पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)