कालवा फुटीप्रकरण : बाधित कुटुंबांची संख्या 759 वर

98 कुटुंबे पूर्ण बाधित : गिरीश बापट यांची माहिती : पंचनामे झाले नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी

पुणे – दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून आलेल्या पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या 759 वर गेली आहे. त्यापैकी 98 कुटुंबे पूर्ण बाधित असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. तसेच पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित पंचनामे करण्यासाठी आठ पथके तयार केली असून मंगळवारपासून (दि.2) सुरुवात होणार असल्याची माहिती बापट यांनी दिली.

-Ads-

विधानभवन येथे पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक धीरज घाटे, महेश लडकत, शंकर पवार, आनंद रिठे, रघु गौडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, दत्तात्रय कवितके, सिंचन विभागाचे एस. डी. चोपडे आदी उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले, बांधीत कुटुंबांचे पंचनामे सुरू आहेत. या संदर्भात काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राहिलेले पंचनामे पूर्ण करण्यासाठी आठ पथकांची नियुक्ती केली आहे. त्या परिसरातील नगरसेवकांच्या मदतीने राहिलेले पंचनामे पूर्ण होतील. कोणावरही अन्याय होणार नाही, यांची काळजी घेण्यात येत आहे.

या घटनेमध्ये बाधित कुटुंबांना शहर अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत गहू आणि तांदूळाचे वाटप सुरू केले आहे. काही ठिकाणी गव्हाबद्दल तक्रारी केल्या आहेत. त्यांची पाहणी करून चांगल्या प्रतीचा गहू उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राहिलेल्या अडीचशे कुटुंबांना उद्या वाटप केले जाणार आहे. तेथील कुटुंबांकडे साठविण्यासाठी कोणती सुविधा नसल्यामुळे या धान्याचे वाटप टप्याटप्प्याने होणार आहे. तर, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सिलिंडर आणि गॅसचे वाटप होणार आहे, असेही बापट यांनी सांगितले.

कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर
मुठा कालवाग्रस्तांना आवश्‍यक ती सर्व मदत करण्यात येईल. बाधित नागरिकांसाठी जातप्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे देण्यासाठी लवकरच शिबीर घेण्यात येईल, असे बापट यांनी यावेळी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)