कालवाग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यात

सोमवारपासून रस्त्यावर चूल मांडो आंदोलन

पुणे – खडकवासला कालवा फुटून दांडेकर पूल वसाहतीमधील नुकसान झालेल्या कुटुंबाना तातडीची बाब म्हणून आवश्यक असलेली मदत अद्यापही मिळत नसल्याने या नागरिकांनी आता प्रशासनाला जागे कारण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. रविवारपर्यंत ज्याची पूर्ण घरे वाहून गेली आहेत. त्यांना घर न मिळाल्यास सोमवारी सकाळीपासून नालंदा बुद्ध विहार ते कालवा फुटलेल्या भिंतीपर्यंत रस्त्याच्या कडेला चूल पेटवून हे आंदोलन केले जाणार असल्याचे कालवाग्रस्त राजेंद्र चौधरी यांनी ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.

-Ads-

कालव्याचे पाणी घरात घुसल्याने सुमारे 98 घरे वाहून घरामधील साहित्याचे नुकसान झाले आहे. तर अनेकांचा सगळा संसार वाहून गेल्याने या नागरिकांना जवळच असलेल्या शाळेत आसरा घ्यावा लागला असून मदत मिळणार असल्याने काम सोडून या कुटुंबाना दिवसभर घराबाहेर थांबावे लागत आहे. सुरुवातीला काही दिवस महापालिका, स्वयंसेवी संस्था तसेच नगरसेवकाकडून नाश्ता, पाणी जेवण दिले जात होते मात्र आता ते सुद्धा बंद झाले आहे. तर घरात काही करायचे झाल्यास ना भांडी आहेत ना गॅस त्यामुळे नागरिकाची सहनशीलता संपली असून आता प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला आहे.

शांततेत करणार आंदोलन
या आंदोलनात कोठेही कालवाग्रस्त रस्ता आडविणार नसल्याचे चौधरी म्हणाले. नालंदा बुद्ध विहार ते कालवा फुटलेल्या भिंतीपर्यंत सुमारे 100 ते 250 कुटूंब चूल रस्त्याच्या कडेला पेटविणार आहेत. ज्याची घरे पूर्णपणे वाहून गेली आहेत. त्यांना आठ दिवसापासून उघड्यावर राहावे लागत आहे. अशा स्थितीत त्यांना तातडीनं घरे मिळावी ही आमची प्रमुख मागणी असून त्याच्या घरात पाणी घुसले आहे त्यांनाही तातडीनं मदत मिळावी ही मागणीही असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)