कालवाग्रस्तांना थेट अनुदानाद्वारे मदत

दोन महिन्यांनंतर पालिकेला मिळाला वेळ

पुणे – मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-

ही रक्‍कम या नागरिकांना थेट त्यांच्या बॅंक खात्यात दिली जाणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या मदतीवर, पूर्णतः बाधितांसाठी नऊ लाख नव्वद हजार रुपये आणि अंशतः बाधितांसाठी तेहतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. एकूण 759 कुटुंबांना 43 लाख पस्तीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

निर्णयास विलंब का?
कालवा फुटून कासम प्लॉट येथील झोपडपट्टी वस्तीमध्ये पाणी वाहात होते. सिंहगड रस्त्यावरील केदार सहकारी गृहरचना संस्था व स्टेट बॅंक कॉलनीमधून रस्त्यावर आलेले पाणी दांडेकर पूल परिसरात पसरल्याने या झोपडपट्टीतील कुटुंबे बाधित झाली होती. पाण्याच्या प्रवाहाने काही झोपड्या पडल्या होत्या. अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू, भांडी, टीव्ही, फ्रीज, गॅस सिलिंडर, कपडे, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे आदी सामान वाहून गेले होते. ही बाब लक्षात घेऊन महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा प्रकारे मदत देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच साहित्य देऊ असा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता अचानक प्रशासनाने अनुदान बॅंकेत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, अनुदानाच द्यायचे होते, तर दोन महिने कशासाठी लावले असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)