कालभैरवाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

म्हसवडला हजारो भाविकांची उपस्थित

म्हसवड – लाखो भक्ताचे आराध्यदैवत व म्हसवडनगरीचे ग्रामदैवत श्रीकाळभैरव जयंती जन्मोत्सवानिमित्त दिनांक 29 रोजी रात्री 9 वाजता मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील मुर्तीवर भाविकांनी फुले टाकुन श्रीसिध्दनाथ (काळभैरव) जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

सिध्दनाथ जन्मोत्सवा निमित्ताने सिध्दनाथ व जोगेश्‍वरी मातेस अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी सहा ते साडेआठ वाजता दिपोत्सव साजरा करून शहरातील हजारो महिलानी मंदिर परिसरात पणती, मेणबत्ती, समई लावून आगळा वेगळा दीपोत्सव साजरा केला. मंदिर परिसरातील डिकमली पेटवण्यात येऊन परिसरात रांगोळी काढण्यात आली होती. रात्री नऊ वाजता मुख्य आरती झाल्यावर जन्मकाळानिमित्ताने मुख्य मुर्तीवर फुले टाकुन सिध्दनाथ जन्मोत्सव साजरा केला.

त्यानंतर रात्री दहा पासून भजन, किर्तन व भारुडाचा कार्याक्रम घेण्यात आला. दीपावली पाडव्यापासुन सुरू झालेला हा श्रींच्या विवाह सोहळ्यानिमित्त घटस्थापना, उभे नवरात्र, नगरप्रदक्षिणा व दिवाळी मैदान, तुलसी विवाहाला सिध्दनाथ जोगेश्‍वरी यांचा विवाह आदी कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडले आहेत. या उत्साहानंतर विवाहनंतरची वरात म्हणजेच सिध्दनाथाची रथयात्रा दि. 8 रोजी होत आहे. मंदिराच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यावर आले असून बांधकाम सध्या सुरू असले तरी यात्रा काळात बांधकाम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. यात्रा कालावधी संपल्यावर पुन्हा कामास सुरवात करण्यात येणार आहे.

भाविकांनी बांधकामासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सिध्दनाथ देवस्थान पब्लिक ट्रस्टचे चेअरमन बजिरंग गुरव (लडे), दत्तात्रय होंकारे, राजाराम गुंजाने, वैभव किर्तने, राजकुमार लांबोळी आदींनी केले आहे. म्हसवड पालिकेतर्फे रथ मार्गाचे व यात्रा पटांगणाचे, शहरातील स्वच्छतेचे काम सुरू आहे. यात्रेत व्यापारी येण्यास सुरुवात झाली असुन पुढील चार दिवसात व्यावसायिकांना पालिकेकडून जागावाटप होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)