कार विक्रीच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

पिंपरी – जुनी कार विकण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल 3 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला.

विजय भगवान दगडे (वय-36, रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन महेश कुमार व डॉ. निलेश बोराडे (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोशल साईट’वरुन जुनी चारचाकी विकायची आहे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आरोपींनी दगडे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. व्यवहार करताना त्यांनी गाडीचे एयरपोर्ट येथील पार्कींगसाठी व कार विम्यासाठी 3 लाख 16 हजार 300 रुपये उकळले. हा सारा व्यवहार 21 ऑक्‍टोबर 2018 रोजी झाला. मात्र अद्यापही गाडी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे दगडे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)