कार विकायची असल्याचे सांगून साडे तीन लाखांचा ऑनलाइन गंडा

दिघी (वार्ताहर) – आपली कार विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्‍स ऍपवर टाकून तीन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रविण पठारे (वय-34, रा.चऱ्होली बुद्रुक ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 फेब्रुवारी रोजी आरोपींनी ओएलएक्‍स या ऍपवर इनोव्हा कार विकायची असल्याची जाहिरात टाकली. फिर्यादी यांनी आरोपींना फोन करुन विचारले असता, आरोपींनी कार विकायची असल्याचे सांगून अरुण इंटरप्रायझेसच्या खात्यावर तीन लाख 45300 रुपये भरण्यास सांगितले.

फिर्यादीने ऑनलाइन आरटीजीएसद्वारे अरुण इंटरप्रायजेसच्या खात्यावर रक्‍कम ट्रांसफर केली परंतु आरोपींनी त्यांना न देता फसवणूक केली. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर.जे.काळे पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)