कार रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

पुणे, दि.7- कार रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना खडकी येथील ऑलसेंट चर्चजवल घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जगतलाल शुक्‍ला(45,रा.मांजरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कार चालक प्रमोद करणकर(40) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अरविंद कुशावह (28,रा.हडपसर) हे त्यांचा मित्र राजेश शुक्‍ला याच्या दुचाकीवर बसून चालले होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची कार वेगात रस्तादुभाजकारव धडकली. यावेळी कारची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीचालक राजेश शुक्‍ला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर फिर्यादी गंभीर जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)