कार पेटवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) – पूर्वीच्या भांडणातून पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून कार पेटवल्याप्रकरणी कराड तालुका पोलीसात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. भरत देसाई व संजय पाटील (रा. आणे, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत आकाराम रामचंद्र गरुड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पूर्वी झालेल्या भांडणातून आकाराम गरुड यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे चिडून जाऊन भरत देसाई व संजय पाटील यांनी गरुड यांची घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये लावलेली कार बाहेर काढून पेटवून दिली. रात्रीच्या वेळेस गरुड यांचा मुलगा लघुशंकेसाठी उठला असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाल्याने कार आगीत जळून खाक झाली. याप्रकरणी दोघांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)