कार धडकेत,एक जखमी

नगर – बुरूडगाव रस्त्यावर कारच्या धडकेत पायी चालणारा तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी कुणाल गोरक्षनाथ बागडे (रा.सावेडी, त्रिणेम निवास साईबन ,कॉलनी सावेडी ,अ.नगर ) हा तरूण बुरूडगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिकत असूून कॉलेजमधून दि.13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पायी पायी घरी जात असतांना पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्वीफ्ट कार एमएच 14 बीएक्‍स 4518 वरील अज्ञात चालकाने जोराची धडक दिल्यामुळे पायी जाणाऱ्या कॉलेजच्या तरूणाला गंभीर दुखापत झाल्याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)