चिंचवड – रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका ४३ वर्षीय रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवार (दि.११) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी येथील इंदिरा कॉलेज समोरील मुंबई-बेंगलोर महामार्गावर झाला होता.

रौफ रहिम खान (वय ४३, रा. सर्वे नं.५२, गल्ली नं.३०, मक्का मस्जिद, भाग्योदयनगर, कोंढवा) असे उपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांना मुलगा शाहरुख खान (वय १८) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.११ मे रात्री साडेआठच्या सुमारास मयत रौफ खान हा रिक्षा चालक हा हिंजवडी येथील इंदिरा कॉलेज समोरील मुंबई-बेंगलोर महामार्ग ओलांडत होता. इतक्यात भरधाव येणाऱ्या एका कारचालकाने रौफ यांना जोरदार धडक दिली. कारचालक घटना स्थळावरुन पसार झाला. या अपघातात रौफ हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी (दि.२२) पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा शाहरुख याने हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस आरोपी कार चालकाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)