कार्वेनाका महिलांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

कराड, दि. 13 (प्रतिनिधी) – घराच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभे करू नका असे म्हणत हातातील लोखंडी गजाने मारहाण केल्याने तिघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक महिला व तिच्या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या. याबाबतची फिर्याद तालुका पोलिसात देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. लता भाऊसाहेब कुंभार (वय 42 वर्षे) रा. सुयोगनगर, गोळेश्वर रोड कार्वेनाका कराड यांना व त्यांच्या दोन मुलींना मंगळवार, दि. 12 रोजी दुपारी दोन
वाजण्याचे घराच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभे करू नका असे म्हणत रमेश गजानन कुंभार (वय 42 वर्षे) व रवी रमेश कुंभार
(वय 24 वर्षे) दोघे रा. सुयोगनगर, गोळेश्वर रोड कार्वेनाका यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी तसेच हातात असलेल्या लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)