कार्ल्याचा बोटिंग क्‍लब बंद!

कार्ला : बोटिंग क्‍लब बंद असल्याने धूळखात पडलेल्या बोटी.
  • पर्यटकांमध्ये नाराजी : एमटीडीसीच्या महसुलात घट

कार्ला – लाखो पर्यटक उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासह लोणावळा, खंडाळा, कार्ला भागात येत असतात. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) कार्ला बोटिंग क्‍लब बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी राहण्याची सोय, वॉटर पार्क, हॉटेल, कान्फरन्स हॉल, लग्न समारंभासाठी गार्डन, मुलांना खेळण्यासाठी बाग, मनोरंजनाची साहित्य अशा अनेक सुविधा पर्यटकांना मिळतात.

लोणावळा, खंडाळा परिसरात हॉटेलची संख्या वाढत असून खासगी वॉटर पार्क, पवना नगर परिसरात पवना धरणावर बोटिंग, टेंट सुविधा वाढल्या असल्या, तरी थंड हवा व अधिक सुविधा एकाच जागी असल्याने पर्यटकांची कार्ला “एमटीडीसी’ ला पसंती आहे; परंतु आता या ठिकाणी अनेक सुख-सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांत नाराजी दिसून येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने गेल्या 30-40 वर्षांपासून पर्यटकांची पसंती असलेला इंद्रायणी नदीवरील बोटिंग सफर दोन वर्षांपासून बंद असल्याने पर्यटक “एमटीडीसी’ कडे पाठ फिरवत आहेत.

एमटीडीसीच्या दिरंगाईमुळे पर्यटनावर, व्यावसायिकांवर देखील याचा परिणाम होऊन बेरोजगारी वाढत आहे.
महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडे रॉयल्टी भरल्याशिवाय बोटिंग क्‍लब चालू करू नये, असे बंद असण्याचे कारण एमटीडीसीने सांगीतले. परंतु लवकरच यावर तोडगा काढून पुन्हा बोटिंग क्‍लब सुरू करू, असे प्रशासनाने सांगीतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)