कार्ला येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना “डिजिटल 10′ अप उपलब्ध

कार्ला : येथील एकवीरा विद्या मंदिर शाळेतील दहावीच्या मुलांना "10' ऍप वाटप करताना भरत येवले व नंदू मोरे मान्यवर.

कार्ला – “डिजिटल इंडिया’ या संकल्पनेतून तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व माय मावळ फाउंडेशनच्या वतीने कार्ला येथील एकवीरा विद्या मंदिर शाळेतील दहावीच्या 68 विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास सोपा व्हावा या हेतूने हे “डिजीटल दहा’ हे अप मोफत देण्यात आले.

मावळ तालुक्‍यामध्ये प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा, सहज व सुलभ करण्यासाठी मुंबई (दादर) येथील आयडियल बूक कंपनीचे “आयडियल दहा’ हे ऍप संपूर्ण मावळ तालुक्‍यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सुनील शेळके यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

या वेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शहाजी लाखे, ज्येष्ठ शिक्षक संतोष हुलावळे, विकास दगडे, काकासाहेब भोरे, दिलीप पोटे, अरुणा बुळे, उमेश इंगुळकर, बाबाजी हुलावळे, पूजा हुलावळे, वरुन दंडेल यांच्यासह दहावीचे 68 विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)