कार्ला गडावर देवीच्या तेलवनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

कार्ला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कोळी, आग्री, कुणबी, सोनार आदी समाजांची कुलस्वामिनी असणाऱ्या आई एकविरा देवीचा तेलवणाचा कार्यक्रम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या उपस्थितीत तेलवनाच्या मानकऱ्यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) पहाटे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

एकविरा देवीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे देवीचा मुख्य असा तेलवणाचा आणि मनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. रविवारी पहाटे असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे तसेच मानकरी चौलचे अग्रावकर आणि पेणचे वासकर यांचे हस्ते हा कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी केलेले नवस फेडण्यासाठी येथे सहकुटुंब आलेल्या भाविकांनी विविध प्रकारे आपली भक्ती देवीच्या चरणी अर्पण केली. देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त मदन भोई, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, विलास कुटे, काळूराम देशमुख, विजय देशमुख, पार्वतीबाई पडवळ ही विश्‍वस्त मंडळी उपस्थित होती.

चैत्र शुद्ध पष्टी ते चैत्र शुद्ध अष्टमी या दरम्यान दरवर्षी कार्ला गडावर देवीची यात्रा भरत असते. या काळात या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करीत असतात. यंदा देवीची यात्रा शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी आल्याने भाविकांनी कार्ला गडावर लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सक्‍त केलेल्या बंदोबस्तामुळे प्रचंड गर्दी असूनही यात्रा शांततेत पार पडली. देवीच्या पालखी मिरवणुकीच्या दरम्यान स्वतः पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मावळचे प्रांत सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई, ज्ञानेश्‍वर शिवथरे, रामदास इंगवले, चंद्रकांत जाधव, बालाजी गायकवाड यांनी उपस्थित सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)