कार्यकारी अभियंत्याच्या अंगावर काळे ऑईल ओतले

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून पेव्हर ब्लॉक फेकण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी पाटील यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बांधकाम सहायक अभिजीत साठे आणि स्विपर नितीन प्रसाद या दोघांनी कामाच्या वादातून पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतले आहे. तसेच त्यांच्या दिशेने पेव्हर ब्लॉक फेकून मारला. पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतल्यानंतर परिसरातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, तेथील कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कुलगुरुंना भेटल्याशिवाय पाटील यांना ससून रुग्णालयात न पाठविण्याचा पवित्रा घेतला होता.

विद्यापीठाचे निवेदन
राजेंद्र पाटील यांच्यावर सकाळी झालेल्या हल्ला प्रकरणात विद्यापीठाने निवेदन दिले आहे. यामध्ये राजेंद्र पाटील यांनी विद्यापीठाकडे तक्रार दिली असल्याचे म्हटले आहे. स्थावर विभागाच्या आवारात सकाळी 11.15 वाजता हा प्रकार घडला. पाटील हे सकाळी विभागात आले असता त्यांच्या विभागातील बांधकाम सहायक अभिजित शंकर साठे आणि स्वच्छता कर्मचारी नितीन मुन्नालाल प्रसाद यांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या अंगावर ऑईल टाकून पेव्हर ब्लॉक फेकून मारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)