कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीमुळे चांगले दिवस

मंचर- गावागावातील वाडी-वस्तीवरील अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांनाही आता लोकसभा निवडणुकीमुळे चांगले दिवस आले आहेत. मागील पाच वर्षांत कार्यकर्त्यांना विसरलेले नेते आता मात्र कार्यकर्त्यांच्या घरी जाऊ लागले आहेत.त्याचप्रमाणे या कार्यकर्त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस करु लागले आहेत. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना निवडणुकीत चांगली मागणी राहणार आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अनेक भागांमध्ये वेग आला असून प्रचाराने जोर धरला आहे. सर्व उमेदवार आपला प्रचार करताना पहावयास मिळत असून गेली पाच वर्ष अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांनाही आता नेतेमंडळींचे फोन येऊ लागले आहेत. पूर्वी पक्ष, नेता, कार्यकर्ता हे एकमेकांशी एकनिष्ठ असायचे; परंतु मागील काही वर्षांपासून पक्षनिष्ठा ही आपल्या सवडीनुसार आपल्या स्वार्थासाठी वापरली जात आहे. एका पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने लगेच दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

त्यामुळे आपला नेता सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात तिकिटासाठी जात असल्याचे पाहून नेत्यावरील निष्ठाही सध्या कार्यकर्त्याची कमी झाली आहे. पूर्वी घरच्या भाकरी बांधून प्रचार करणारा कार्यकर्ते सध्या दिसेनासे झाले आहेत. रोजंदारीवरील कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. सध्या निवडणुकीची प्रत्येक पक्षाची तिकिटे ही जवळपास निश्‍चित झाली आहेत. येणाऱ्या काही दिवसात निवडणूक अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)