कार्बन डायऑक्‍साईड हा उपयुक्त घटक बनवण्याचा प्रयत्न

नासाने आयोजित केली वैज्ञानिकांची स्पर्धा
वॉशिंग्टन – जगात मोठ्या प्रमाणात सध्या कार्बन डायऑक्‍साईड या घातक वायुची निर्मीती होत आहे. तथापी हा वायु घातक असला तरी त्याचे रूपांतर उपयुक्त घटकात करणे शक्‍य आहे काय याची चाचपणी नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थे तर्फे केली जात आहे. नासा तर्फे मंगळाचीही मोहीम सुरू आहे त्याठिकाणीही याचा उपयुक्त वापर करता येणे शक्‍य आहे काय या विषयीच्या कल्पना वैज्ञानिकांनी सुचवाव्यात असे आवाहन नासाने केले असून त्यासाठी त्यांनी एक स्पर्धाही आयोजित केली आहे.

मंगळावरही कार्बन डायऑक्‍साईडी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कार्बनचे रूपांतर उपयुक्त वायुच्या स्वरूपात करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या विषयीचे काही नाविन्य पुर्ण तंत्रज्ञान उपलब्ध झाले तर त्याचा वापर मंगळावर करता येईलच पण पृथ्वीवरही त्याचा चांगला उपयोग करून घेता येणे शक्‍य होईल असे नासाचे म्हणणे आहे. ही शक्‍यता अमर्याद आहे पण त्यासाठी नाविन्यपुणे संकल्पना सुचवल्याजाणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर होणे हे अगत्याचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)